गुरूकूल कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव
जळगाव (9 जुलै 2025) : आपल्या जीवनात गुरूचे स्थान सर्वोच्च असून गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा अशा या दिव्य गुरुतत्त्वाच्या पूजनाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यत्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) गुरुकुल कॉलनी, क्रॉवून बेकारी मागे, सेट. जोसेफ स्कूल जवळ, एमजे.कॉलेज रोड जळगाव यांच्या वतीने, गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.





गुरूवार, 10 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम यात आठ वाजता भूपाळी आरती, गुरूपूजन सकाळी 8 ते रात्री 8 वाजता, 11 वाजता माळ जप, सकाळी 10.30 वाजता आरती व महानैवैद्य, 11 वाजता मार्गदर्शन, सामुदायिक श्री स्वामी चरित्र वाचन, संध्या 6 वा 30 मि.आरती या पवित्र दिवशी जास्तीत जास्त संख्येत सर्व भाविक सेवेकरी यांनी आपल्या घरातील,परिसरातील मित्र मंडळी यांनी अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज याचे गुरु पद घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
