जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : रॉयल पॅलेस हॉटेलमधील जुगारावर कारवाई ; 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
Jalgaon Crime Branch’s big achievement : Action against gambling at Royal Palace Hotel; Property worth Rs 20 lakh seized जळगाव (11 जुलै 2025) : जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जळगावच्या हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नंबर 209 मध्ये सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकत तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई जळगाव जिल्ह्यातील सट्टेबाजांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अशी झाली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 जुलै रात्री 11 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागुल, हवालदार अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, संदीप चव्हाण, किशोर पाटील, रवींद्र कापडणे आदींच्या पथकाने हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी वरिष्ठांच्या परवानगीनंतर धाड मारली.





स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आपले वाहन सागर पार्क येथे लावले व पायीच हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर संबंधित खोलीत छापेमारी केल्यानंतर यावेळी जुगाराचा डाव सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
मध्यरात्री झालेल्या कारवाईने खळबळ
पप्पूजी (44, रा.जळगाव), रुखील (32, रा.एम.आय.डी.सी., जळगाव), भावेश पंजोमल मंधाण (37, रा.राजाराम नगर सिंधी कॉलणी, जळगाव), मदन सुंदरदास लुल्ला (42, रा.गणपतीनगर जळगाव), सुनील शंकरलाल वालेचा (40, रा.सिंधी कॉलनी कंवरनगर, जळगाव), अमीत राजकुमार वालेचा (45, रा.गणेशनगर जळगाव), विशाल दयानंद नाथानी (48, रा.गायत्रीनगर घर नं.70 जळगाव), कमलेश कैलाशजी सोनी (36, रा.वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड, जळगाव) यांना मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.
20 लाखांचा मुद्देमाल जप्त
रॉयल पॅलेसमधील खोली क्रमांक 209 ही मदन लुल्ला याचे नावावर आरक्षीत होती व आठ संशयीतांकडून 19 लाख 97 हजार रुपये किंमतीची रोख रक्कम व वेगवेगळया कंपनीचे 13 मोबाईल जप्तकरण्यात आले. एएसआय अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
