आमदार संजय गायकवाड यांच्या वाढल्या अडचणी : हे आहे कारण


मुंबई (11 जुलै 2025) : आपल्याला शिळं अन्न दिल्याने शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनच्या कर्मचार्‍याला मारहाण केली होती. त्या संबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मारहाणीप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 352 अपमानित करणे, 115(2), मारहाण करणे , 3(5), संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे. समाज माध्यमांमधील व्हिडीओ आणि स्थानिकांकडे केलेल्या चौकशीच्या आधारे या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.






चांगल्या गोष्टीसाठी कितीही गुन्हे दाखल होवोत
मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !