आदित्य ठाकरेंचा खोचक टोला : 50 खोक्यांपैकी एक खोका समोर आला
हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस : संजय राऊत यांची टीका
Aditya Thackeray’s Khochak Tola: One of the 50 boxes came to light मुंबई (11 जुलै 2025) :बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलणारे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व्हायरल व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत. या व्हिडिओमध्ये पैशांनी भरलेली एक बॅग दिसत असून ती पैशांचा दावा केला जात आहे तर विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. एवढे पैसे आले कुठून? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करीत 50 खोक्यांपैकी एक खोका दिसल्याची टीका त्यांनी केली आहे.
एवढे सगळे पैसे आले कुठून?
विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आजकाल बरेच संजय चर्चेत येत आहेत. काल परवा संजय गायकवाड चर्चेत आले होते. त्यांनी मारहाण केली होती. आज संजय शिरसाट चर्चेत आले आहेत. जे बनियान-चड्डीवर बसले आहेत आणि तिथे बाजूला आम्ही ज्या खोक्यांच्या बद्दल बोलत होतो आधीपासून, 50 खोके एकदम ओके, त्यातला एक खोका तिथे दिसत आहे. पहिली गोष्ट तर ही आहे की एवढे सगळे पैसे आले कुठून? कोणी दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





काय कारवाई केली जाणार?
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जी आयकर विभागाची नोटीस त्यांना आली, त्यावर काय कारवाई केली जाणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावर कारवाई होणार की नाही? एवढा व्हिडिओ समोर आला आणि त्यांना माहीत नाही म्हणतात, ते कोणत्या नशेत होते? याचा देखील तपास झाला पाहिजे. मुख्यमंत्री यांचा राजीनामा नाही घेऊ शकत का? नोट बंदीनंतर सांगण्यात आले होते की 2 लाखांच्यावर कोणी कॅश नाही ठेऊ शकत. मग एवढे पैसे आले कुठून?
हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस : संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील संजय शिरसाट यांचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस, असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली.
