रावेर तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात : खंडव्यातील दुचाकीस्वार ठार
Fatal two-wheeler accident in Raver taluka : Two-wheeler rider from Khandwa killed रावेर (12 जुलै 2025) ; स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकलस्वार पडल्याने दुचाकीस्वाराचा ठार झाला. मनीष मनोहर सोलंकी (24, रा.दुगवाडा, जि.खंडवा) असे मृत युवकाचे नाव आहे. हा युवक सावदा येथे कामासाठी जात असताना हा अपघात झाला.
भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार
शुक्रवारी सायंकाळी मनीष सोलंकी आपल्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून सावद्याच्या दिशेने जात असताना वाघोडजवळ अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरवरून त्याची गाडी असंतुलित झाली आणि तो रस्त्यावर आदळला. अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक, रिफ्लेक्टर अथवा स्पीड ब्रेकरचे स्पष्ट चिन्ह नव्हते, हे यामधून उघड झाले.





