उज्वल निकम राज्यसभेवर : राष्ट्रपतींकडून चार सदस्यांची नियुक्ती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची केली नियुक्ती
Ujjwal Nikam to Rajya Sabha : Four members appointed by President जळगाव (13 जुलै 2025) : ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राज्य सभेवर निवड करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची नियुक्ती केली आहे.
रिक्त जागांवा नियुक्ती
राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे, ज्यामध्ये 238 निवडून आलेले सदस्य असतात तर 12 नामनिर्देशित सदस्य आहेत. आता राष्ट्रपतींनी केलेले चार जणांचे नामांकन पूर्वी नामनिर्देशित सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांवर करण्यात आले आहे. संविधानाच्या कलम 80(1)(र) च्या कलम (3) द्वारे राष्ट्रपतींना मिळालेल्या अधिकारांनुसार त्यांनी चार जणांची नियुक्ती राज्यसभेवर केली आहे.





गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उज्वल निकम यांनी भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला. त्यानंतर आता निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम पाहिले असून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
