नाशिक पुन्हा हादरले : चारित्र्याच्या संशयातून पतीची हत्या
Nashik shaken again : Husband murdered over suspicion of character नाशिक (13 जुलै 2025) : पत्नीच्या चारित्र्यावर पती सातत्याने संशय घेत असल्याने पत्नीने पतीचा झोपेत गळा आवळला व मृतदेह गावाशेजारी असलेल्या जंगलात फेकला. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या दरेगावामध्ये घडली. कैलास पवार असे मृताचे नाव असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
तपास सुरू असताना पोलिसांना मयत व्यक्तीच्या पत्नीची वर्तवणूक शंकास्पद वाटल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती म्हणजे कैलास पवार हा सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून तो मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. संशय घेऊन पतीकडून सुरू असलेल्या त्रासाला ती कंटाळली. त्यानंतर तिने पतीला संपवण्याचे ठरवलं. त्यानंतर पती रात्री झोपेत असताना महिलेने दोरीने गळा आवळून हत्या केली.




