यावल तहसील कार्यालयात होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे निवेदन : 16 जुलैपासून आंदोलनाचा इशारा
Homeopathy Doctors Association’s statement at Yaval Tehsil office warns of agitation from July 16 यावल (14 जुलै 2025) : यावल तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी यावल तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनकडून निवेदन देण्यात आले आहे. 15 जुलैपासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे होमिओपॅथिक सीसीएमपी रजीस्ट्रेशन सुरू करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. तसे न केल्यास 16 जुलैपासून संघटनेकडून आंदोलन व उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहेत मागण्या
यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे यावल तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या 2014 च्या कायद्यानुसार जर 15 जुलै पासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तर्फे होमिओपॅथिक होमिओपॅथिक सीसीएमपी रजीस्ट्रेशन सुरू झाले नाही तर आम्ही राज्यातील एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर 16 जुलैपासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारणार आहोत. आम्ही हजारो डॉक्टर्स आझाद आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहोत. व या उपोषण दरम्यान जर कोणाला काही झाले तर सर्व जबाबदार मेडिकल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल व राज्य सरकार वरती त्याची जबाबदारी राहील. तेव्हा डॉक्टरांनी 15 जुलैपासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे होमिओपॅथिक रजिस्ट्रेशन सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली.





