जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : मंदिराचे साहित्य लांबवणार्यांना बेड्या
Jalgaon MIDC police’s big achievement : Those who stole temple materials were shackled जळगाव (14 जुलै 2025) : देवाच्या दरबारातील चांदीच्या मुकुटासह अन्य साहित्य लांबवणार्या चोरट्यांना जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
काय घडले जळगावात
शहरातील मुकुंद नगरातील लाठी शाळेमागील मानेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिरातील महादेवाच्या पिंडास असलेल्या चांदीच्या मुकुटासह इतर दागिने हे मंदिरासमोर राहत असलेल्या अरुण लक्ष्मण शेटे यांचे घरी ठेवले हातात व सण-उत्सवावेळी मंदिरात पिंडास लावले जातात. अरुण शेटे हे कुटुंबासह पुण्यात मुलाकडे गेल्यानंतर घरात ठेवलेले महादेव मंदिराचे 61 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने लांबवण्यात आले व एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गोपनीय माहिती व फुटेजच्या आधारे शाकीब शेख ताजुद्दीन शेख (24, कासमवाडी, जळगाव), राहुल शेखर रावळकर (32, रा.जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) यांना पोलिसांनी अटक केली व मुद्देमाल जप्त केला.





