जळगावात आर.आर.विद्यालयातील ‘त्या’ विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

शाळा प्रशासनाने दडपली माहिती : मृत्यूचे कारण शवविच्छेदनात स्पष्ट


‘That’ student of RR Vidyalaya dies after being beaten in Jalgaon जळगाव (15 जुलै 2025) : जळगावातील आर.आर.विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा कल्पेश वाल्मीक इंगळे (15, रा.रचना कॉलनी) या विद्यार्थ्याचा मृत्यू अन्य विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीत झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. सुरूवातीला शाळा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती दडपल्यने याबाबत संताप व्यक्त होत आहे.

मुलांमध्ये हाणामारीनंतर घडला प्रकार
डोक्यावर पडल्याने मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.






चक्कर येऊन तो पडल्याचे सांगितले जात असले तरी मुलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. याबाबत रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसात त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका यांनी दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

कल्पेशला चक्कर येऊन पडल्याने शाळेतील शिक्षकांनी खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती; परंतु त्याच्या व्हॅनचालकाने मुलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती कल्पेशचे वडील वाल्मीक इंगळे यांना दिली होती. त्यावरून त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासणी करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, सीसीटीव्ही फूटेज, विद्यार्थ्यांचे जबाब आणि घटनास्थळाच्या पाहणी केली मात्र या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मारहाण करणारी मुले कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे डीवायएसपी संदीप गावीत यांनी सांगितले.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयीत मुलाला ताब्यात घेतले असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !