नवापूरातील श्री जी गेस्ट हाऊसवर छापा : तिघांविरुद्ध गुन्हा
नवापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असतानाही शहरातील श्री जी गेस्ट हाऊस सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक नासीर पठाण व पथकाने बुधवारी संध्याकाळी नागपूर-सुरत महामार्गावरील श्री जी गेस्ट हाऊसवर छापा टाकत महिला व पुरुषाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी त्या महिला व पुरूषासह श्री जी गेस्ट हाऊस संचालक नानकचंद हिरालाल अग्रवाल (रा.आदर्श नगर, नवापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रजिस्टरमध्ये नोंदीविनाच दिला प्रवेश
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल 2020 रोजी श्री जी गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी अचानक तपासणी मोहिम राबवल्यानंतर खोली क्रमांक 12 चा दरवाजा बंद आढळला व या संदर्भात विचारपूस केल्यानंतर एका पुरूषासह महिला बाहेर आल्यानंतर त्यांच्या रहिवासाबाबत रजिस्टरमध्ये कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती व नंतर मात्र नोंद करण्यात आली. दरम्यान, श्री जी गेस्ट हाऊस संचालक यांनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी तिघांवर नवापूर पोलिस ठाण्यात लॉकडाऊन दरम्यान गेस्ट हाऊस सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.





