चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : काळवीटाची शिकार करणार्यांना बेड्या

Chopra Rural Police takes major action : Blackbuck poachers arrested चोपडा (17 जुलै 2025) : काळवीटाची शिकार करणार्यांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत. आरेापींकडून मांस व दोन शिंगे जप्त करण्यात आली. आरोपींबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ग्रामीणचे राकेश पाटील आणि गजानन पाटील यांना गोपनीय माहितीनुसार दुचाकी क्रमांक (एम.पी.10 एन.सी.4857) वरून वांगर्या बारेला (रा.टाक्यापाणी, वरला) आणि त्याचा साथीदार वैजापूर आणि परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

वनविभागाला कल्पना दिल्यानंतर फॉरेस्ट कंपार्टमेंट बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर पोलिस निरीक्षक अनिल भवारी, एएसआय राजु महाजन, हवालदार राकेश पाटील, कॉन्स्टेबल गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनील कोळी तसेच वनविभागाचे विकेश ठाकरे, वनपाल सारीका कदम, वनरक्षक बी.आर. बारेला, वनरक्षक बानू बारेला आणि वनरक्षक योगेश सोनवणे यांच्या पथकाने बुधवार, 17 जुलै दुपारी 12 वाजेच्या सुमारास नाकाबंदी केल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या वांगर्या फुसल्या बारेला (48) व धुरसिंग वलका बारेला (45, दोन्ही रा.मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून हणाचे दोन शिंगे आणि मांस जप्त करण्यात आले. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
