जळगावात भीषण अपघात : मालेगावातील तरुण ठार
गतिरोधकावर आदळली दुचाकी : प्रेम नगरातील घटना

Terrible accident in Jalgaon : Youth from Malegaon killed जळगाव (18 जुलै 2025) : मालेगावातील तरुणाचा जळगावात अपघाती मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 15 जुलै रोजी रात्री प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूलजवळ घडला. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सागर रामचंद्र सूर्यवंशी (32, रारावळगाव, ता.मालेगाव) असे मयताचे नाव आहे.
काय घडले जळगावात ?
जळगावातील दशरथ नगरात सोमवार, 14 जुलै रोजी कामानिमित्त सूर्यवंशी हे दुचाकीने सासरी आले असता मंगळवारी रात्री ते दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असताना गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली. त्यात ते खाली पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.