वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात 11 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल


Chargesheet filed against 11 accused in Vaishnavi Hagavane dowry case पुणे (18 जुलै 2025) : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने 1676 पानांचे आरोप पत्र सादर करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर 59 दिवसांनी हे दोषारोप पत्र सादर करण्यात आले.

59 दिवसांनी आरोपपत्र दाखल
वैष्णवी हगवणे यांचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा आणि दीर सुशील यांच्यावर या प्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा अमानुष छळ केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर पूर्ण कुटुंबीयांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात 59 दिवसांनी 1676 पानांचे आरोप पत्र पोलिसांनी सादर केले आहे.


आरोप पत्रात एकूण 11 आरोपींच्या नावाचा उल्लेख
वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या दहा महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्या प्रकरणात नीलेश चव्हाण याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ नीलेश कडे सोपवण्यात आले होते. नीलेश हा वैष्णवीची नणंद करिष्मा हीचा मित्र असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नीलेशचा देखील या आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात एकूण 11 आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आरोपी फरार असताना आरोपींना मदत करणार्‍यांच्या देखील समावेश आहे.

आसरा देणार्‍या पाच आरोपींचा देखील समावेश
वैष्णवीच्या मृत्यू नंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. या दोघांना सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी आसरा देणार्‍या पाच आरोपींचा देखील याचा समावेश करण्यात आला आहे. हे पाचही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. तर एकूण सहा जण हे येरवडा तुरुंगातील कोठडीत आहेत.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !