नशिराबाद टोल नाक्याजवळ अपघात : शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला निघालेला वराडचा तरुण ठार


Accident near Nashirabad toll booth : Varad youth killed while going to visit Shirsala Maroti जळगाव (19 जुलै 2025) : बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोतीच्या दर्शनासाठी मित्रांसह निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवार, 19 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडला. हर्षल राजू पाटील (19, रावराड, ता.धरणगाव) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमीचे कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड, ता.धरणगाव) असे नाव आहे.

काय घडले नेमके
हर्षल पाटील हा वराड येथे आई-वडील व बहिणीसोबत राहत होता. शनिवार, 19 रोजी पहाटे तो गावातील 8 ते 10 मित्रांसोबत बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाला होता.


नशिराबाद गावाजवळील टोल नाक्याजवळील पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणार्‍या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात हर्षलचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला कुणाल पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हर्षल हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने घटनेनंतर घरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !