उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? रोहिणी खडसेंनी चाकणकरांना सुनावले


मुंबई (19 जुलै 2025) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यावर डान्सबारबाबत केलेल्या आरोपांवर बोलणे टाळल्यानंतर बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही ? सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारुन सांगणार का? असा सवाल रोहिणींनी विचारला आहे.

उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षांना अजूनही त्यांचं काम माहिती नाही. राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे. महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? असा टोलाही रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना लगावला.


नेमकं प्रकरण काय?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. काल सभागृहात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे? असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय.

या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे त्यांनी म्हटले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !