प्रियसीने घरी बोलावताच प्रियकरही पोहोचला मात्र नातेवाईक पोहोचताच घडले भयंकर !

As soon as his girlfriend called him home, his boyfriend also arrived, but as soon as the relatives arrived, something terrible happened! गेवराई (20 जुलै 2025) : एकमेकाच्या प्रेमात बुडाल्यानंतर घरी कुणी नसल्याची संधी प्रियसीने साधून प्रियकर तरुणाला घरी बोलावले मात्र त्याचवेळी तरुणीचे नाईवाईक दाखल होताच त्यांचा संयम सुटला व त्यांनी प्रियकराला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला. बीडमधील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे घटना घडली. शिवम काशिनाथ चिकणे (21) असे मृताचे नाव आहे.
काय घडले नेमके
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम होते. प्रेयसीने घरी बोलावले असताना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्यांच्यात वाद झाला.

मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावातही धक्कादायक प्रकार
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत बांबूच्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याला मार लागून पोटात गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अविनाश सगट असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
