मालवाहू वाहनाच्या धडकेने भुसावळ तालुक्यातील गोजोरेचे दोघे ठार
अडावदच्या शेतकी शाळेसमोर सकाळची दुर्घटना
Two people from Gojore in Bhusawal taluka killed after being hit by a cargo vehicle भुसावळ (29 जुलै 2025) : अडावद, ता.चोपडा येथील शेतकी शाळेच्यासमोर दुचाकीला भरधाव बोलेरो (एम.एच.19- सीएक्स 1490) ने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी 7वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील दोन्ही मृत भुसावळ तालुक्यातील गोजोरे गावातील रहिवासी आहे.
असा घडला अपघात
सोमवार, 28 जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास अडावदकडून चोपड शहराच्या दिशेने जाणार्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो वरील चालक मनोज संजय पाटील
याने धडक दिली. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस जोरदार धडक देताच दोन्ही दुचाकीस्वार महेंद्र शांताराम दोडे (17) आणि युवराज तुकाराम तायडे (31) जागीच ठार झाले. दोन्ही मृत हे भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील रहिवासी आहेत.





