यावल शहरातून जिओ टॉवरचे साहित्य चोरी


यावल (29 जुलै 2025) : शहरातून चोपडा शहराकडे जाणार्‍या रस्त्यावर हॉटेल केशर बगीच्याजवळ जिओ टॉवरमधील साहित्याची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने डिझेल सांडून नुकसान देखील केले आहे.

हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावल शहरातून चोपड्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर हॉटेल केशर बाग आहे. या केशर बाग हॉटेलच्या जवळ जिओ कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरमधील साहित्य अज्ञात चोरट्याने चोरी केले.

जनरेटर मधील 140 लिटर डिझेल सांडून नुकसान करण्यात आले. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात जिओ कंपनीचे टेक्निशियन योगेश चौधरी यांनी अज्ञात व्यक्ती विरुध्द तक्रार नोंदवली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !