भुसावळात शिक्षक पतपेढीत दहा कोटींचा अपहार : 16 संशयीत कोठडीत


Rs 10 crore embezzlement in Bhusawal teachers’ credit union: 16 suspects in custody भुसावळ (30 जुलै 2025) : शहरातील नूतन सहकारी पतपेढीत दहा कोटींच्या घोटाळा केल्याप्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आली होती तर 46 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेतील आरोपींना आर्थिक गुन्हा शाखेने मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली मात्र युक्तीवादाअंती आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे प्रकरण
भुसावळातील शिक्षक पतपेढीत झालेल्या अपहारानंतर शासकीय लेखा परीक्षक प्रकाश चौधरी यांच्या तक्रारीवरुन सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेने 16 संशयितांना ताब्यात घेऊन जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले.

सर्व संशयीत न्यायालयीन कोठडीत
आर्थिक गुन्हा शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांनी संशयितांना मंगळवारी दुपारी भुसावळ कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश एस.बी. तिवारी यांच्या कोर्टात हजर केले. पोलिसांतर्फे या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अनेक संशयितांना अद्याप ताब्यात घेणे बाकी आहे. घोटाळ्यात कोणाचा कसा सहभाग आहे याचा शोध घ्यायचा असल्याने संशयितांना सा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावर सरकारी व आरोपींच्या वकिलांमध्ये अडीच तास युक्तीवाद चालला. कोर्टाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

14 विद्यमान संचालकांचा समावेश
घोटाळा प्रकरणी तत्कालीन सभापती रमेश चिंधू गाजरे व 45 जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात 14 विद्यमान संचालक आहेत. यातील 5 संचालक हे घोटाळ्याच्या कालावधीत तत्कालीन सभापती होते. एक विद्यमान सभापती आहेत. चार महिला संचालिका आहेत. तसेच एच.आर.वायकोळे आणि कंपनी सनदी लेखापाल, भुसावळ, तत्कालीन हिशेबनीस, नऊ लिपिक, तीन शिपाई तसेच जेडीसीसी बँकेच्या सात कर्मचार्‍यांचा समावेश आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !