जळगावात माजी आमदारकाकडे 34 लाखांची चोरी


Rs 34 lakhs stolen from former MLA in Jalgaon जळगाव (3 ऑगस्ट 2025) : जळगाव जिल्ह्यात चक्क माजी आमदाराच्या घरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

अमळनेर येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांचे मूळ गाव असलेल्या राजवड (ता. पारोळा) येथील बंगल्यात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील 24 लाख रुपयांचे 700 ग्रॅम सोने व 10 लाख रुपयांची रोकड असा जवळपास 34 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत पारोळा पोलिसात शनिवारी रात्री गुन्हस दाखल करण्यात आला आहे.






माजी आमदार पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथे मुलाकडे गेले होते. त्यांना घरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यांनतर पाटील राजवड येथे पोहचले.

चोरट्यांनी घरातील कपाट आणि बेड उचकावून साहित्य अस्ताव्यस्त केलेले दिसले. चोरट्यांनी घरातील 9 लाख रुपये किमतीच्या 300 ग्रॅम सोन्याची मंगल पोत, 7 लाख रुपये किमतीच्या 200 ग्रॅम 16 सोन्याच्या अंगठ्या, 8 लाख रुपये किमतीच्या 200 ग्रॅम 3 सोन्याचे नेकलेस तसेच 10 लाख रुपये रोख आणि 8 हजार रुपये किमतीचे डीव्हीआर असा एकूण 34 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत नीलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून पारोळा पोलिसात शनिवारी रात्री गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पोलिन निरीक्षक सचिन सानप यांनी फॉरेन्सिव व श्वान पथकास पाचारण केले. तसेच चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्य ठिकाणी पारोळा पोलिसात शनिवारी रात्री गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पोलिन निरीक्षक सचिन सानप यांनी फॉरेन्सिव व श्वान पथकास पाचारण केले. तसेच चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्य ठिकाणी पथके रवाना केली आहेत

पाऊण तास चोरटे घरात
चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि डीव्हीआर चोरून नेले. मात्र एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चार चोरटे धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून माजी आमदारांच्या बंगल्याकडे आले आणि कम्पाउंडच्या भिंतीवरून घरात प्रवेश केल्याचे दिसत आहेत. 2 रोजी पहाटे 2.39 मिनिटांनी घरात प्रवेश करून 3.14 मिनिटांनी म्हणजे 35 मिनिटात चोरी करून बाहेर पडले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !