भुसावळकरांच्या कोरोना बाधीत रुग्णाच्या प्रवासाने वाढल्या अडचणी


भुसावळ : कोरोना बाधीत रुग्णाने भुसावळात प्रवास करीत शहरातील विविध भागात प्रवास केल्याने शहरवासीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नंदुरबार येथील 48 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याने नंदुरबार जिल्हा हादरला असताना या रुग्णाने भुसावळातही आपल्या नातेवाईकांना भेट दिल्याची माहिती सूमोर आल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत.

भुसावळकरांच्या अडचणी वाढल्या
नंदुरबार शहरातील एका भागातील 48 वर्षीय इसमाचा शुक्रवारी रात्री कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली होती तर हा इसम भुसावळातही आल्याची माहिती पोलिस प्रशासनाला शनिवारी मिळाल्यानंतर भुसावळात खळबळ उडाली. भुसावळ शहरातील जुन्या पालिका परीसरातील हॉटेल कन्हैय्याकुंजचा परीसर तसेच जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी तसेच अन्य काही भागात हा रुग्ण गेल्याची माहिती असलीतरी त्यास प्रशासनाकडून अधिकृतरीत्या दुजारो मिळू शकलेला नाही. रुग्णाच्या मोबाईलच्या ट्रॅव्हल्स हिस्ट्रीच्या आधारे पोलिस व आरोग्य प्रशासनाने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शनिवारी दिवसभर शोध घेताना दिसून आले.






अमळनेरच्या महिलेच्या रीपोर्टने वाढवली अडचण
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते तर यातील एकाचा मृत्यू ओढवला होता शिवाय एका पॉझिटीव्ह रुग्णाचा नुकताच निगेटीव्ह अहवाल आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र शनिवारी अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचा रीपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर जळगाव जिल्हावासीयांची चिंता अधिक वाढली आहे. जळगाव जिल्हा आतापर्यंत ऑरेंंज झोन म्हणून जाहीर झाला होता मात्र आता अमळनेरच्या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !