जळगावात डंपरच्या धडकेत व्यापार्याचा मृत्यू,
Businessman dies in a horrific dumper accident in Jalgaon जळगाव (4 ऑगस्ट 2025) : शहरातील अजिंठा चौकात डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे व्यापारी जखमी होवून सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. व्यापार्याच्या मृत्यू पश्चात त्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्याने नेत्रदानाची प्रक्रिया करण्यात आली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश गोविंद चंदनकर (52, रा. शिवकॉलनी) असे मयताचे नाव आहे.
काय घडले जळगावात
व्यापार्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. चंदनकर यांची एमआयडीसी परिसरात कंपनी असून 1 ऑगस्ट रोजी ते कंपनीत जात होते.





यावेळी अजिंठा चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली व त्यांच्या पायावरून चाक गेले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी 4 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. योगेश वाणी हे काथारवाणी समाजाचे माजी अध्यक्ष होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
