लाखाच्या शिसे प्लेट्स लांबवणार्‍या भामट्यांना जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून अटक


Jalgaon MIDC police arrest swindlers selling lacquer lead plates जळगाव (4 ऑगस्ट 2025)  :  शहरातील एमआयडीसी परिसरातील ‘आनंद बॅटरी’ या कंपनीत घरफोडी करून सुमारे 97 हजार रुपये किंमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्सची चोरी करणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. चोरीस गेलेला 327 किलो वजनाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा हस्तगत करण्यात आली.

काय घडले जळगावात
जळगावच्या आनंद बॅटरी कंपनीत 31 जुलै 2025 रोजी रात्री ही चोरी झाली. या कंपनीत बॅटरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या 325 किलो वजनाच्या शिसे धातूच्या प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.






याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, राहुल घेटे, किरण पाटील, नरेंद्र मोरे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !