पाचोरा शहरात विवाहितेने जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
In Pachora city, a married woman tired of being harassed took extreme steps पाचोरा (5 ऑगस्ट 2025) : पाचोरा शहरातील विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून गळफास लावला. ही घटना रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील नंदनवन सिटी येथील राहत्या घरात घडली. माधुरी विशाल सोनवणे (पाटील) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.
काय घडले पाचोरा शहरात
माधुरी सोनवणे यांनी दोन वर्षांपूर्वी 2023 मध्ये विशाल मुरलीधर सोनवणे याच्याशी प्रेमविवाह केला होता. विशाल याने खाजगी नौकरी करुन आपला संसार थाटला. लग्नानंतर काही दिवस चांगला संसार चालल्यानंतर विशाल हा माधुरीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिला मारहाण करु लागला. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने माधुरी हिने मेडिकल स्टोअर मध्ये नौकरी करुन संसाराचा गाडा ओढण्यास विशाल यास मदत करु लागली.





