नंदुरबारात तळीरामांकडून पाच लाखांच्या दारूवर डल्ला
नंदुरबार : कोरोनामुळे सुरू असलेले लॉक डाऊन तसेच संचारबंदीमुळे गेल्या 21 मार्च पासून नागरीक घरातच आहेत. त्यातच सर्वाधिक अवघडल्यासारखी मद्यपींची झाली असून दारू विक्रीची दुकाने तसेच बारही बंद असल्याने नंदुरबार शहरातील आरटीओ ऑफिसजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामावर तळीरामांनी डल्ला मारल्याची घटना उघड झाली आहे. सुमारे पाच लाखांची दारू चोरट्यांनी लांबवली असून 28 मार्च ते 17 एप्रिल दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. आरटीओ ऑफिसजवळील शासकीय दूध डेअरीच्या कंपाउंडमध्ये असलेले राज्य उत्पादन विभागाचे गोदाम असून चोरट्यांनी गोदामाची सिमेंटची पत्रे तोडून तळीरामांनी आत प्रवेश करीत मद्य लांबवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
