जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे

उपाध्यक्षपदी अ‍ॅड.स्मिता झाल्टे ; विजयी उमेदवारांचा जल्लोष


Sagar Chitre elected as president of Jalgaon District Lawyers Association जळगाव (6 ऑगस्ट 2025) : जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी अ‍ॅड.सागर चित्रे यांनी 101 मतांनी विजयी होत बाजी मारली तर सचिवपदी अ‍ॅड.विरेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी अ‍ॅड.स्मिता झाल्टे तर सहसचिव अ‍ॅड.लीना म्हस्के विजयी झाले. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

36 अर्ज दाखल
जिल्हा वकील संघांच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 36 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीवेळी नामंजूर झाल्याने व दोन महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने 13 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (5 ऑगस्ट) रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. यामध्ये एकूण एक हजार 10 मतदारांपैकी 881 जणांनी (87.22 टक्के) मतदान केले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास अंतिम निकाल समोर आला.






अध्यक्षपदी अ‍ॅड.सागर चित्रे यांनी 454 मते मिळवून विजय मिळवला व प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड.संजय राणे (353 मते) यांचा 101 मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदी अ‍ॅड.स्मिता झालटे, सचिवपदी अ‍ॅड.विरेंद्र पाटील, सहसचिवपदी अ‍ॅड.लीना म्हस्के तर कोषाध्यक्षपदी अ‍ॅड.प्रवीण चित्ते हे विजयी झाले.

बिनविरोध सदस्य असे
सदस्यपदासाठी दाखल अ‍ॅड.वर्षा पाटील व अ‍ॅड.अजयकुमार जोशी यांचे अर्ज छाननीवेळी नामंजूर करण्यात आले होते. यातील अ‍ॅड.वर्षा पाटील यांनी अर्ज नामंजुरीविरोधात अपील समितीकडे अपील दाखल केले होते मात्र ते फेटाळण्यात आले. त्यामुळे महिला सदस्यांच्या दोन जागांसाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने अ‍ॅड.शारदा सोनवणे, अ‍ॅड.कल्पना शिंदे या बिनविरोध ठरल्या.

समर्थकांचा जल्लोष
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. पुष्पहार घालून व पेढे भरवून विजयी उमेदवारांचे कौतुक करण्यात आले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड.आर.एन.पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड.मंगला पाटील, अ‍ॅड.ए.आर.सरोदे यांनी काम पाहिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !