किनगावात दुकान फोडून रोकड लांबवली


Shop broken into in Kingaon, cash stolen यावल (6 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील किनगाव गावात अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावर असलेल्या राणे कॉम्प्लेक्समध्ये दुकान अज्ञात चार चोरट्यांनी फोडत गल्ल्यातील चार हजारांची रोकड लांबवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले किनगावात ?
किनगावातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर राणे कॉम्प्लेक्स आहे. राणे कॉम्प्लेक्समध्ये गोपाळ लोटन चौधरी (रा.चिंचोली) यांचे जय भद्रा हार्डवेअर व इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे पूर्वी दुकानात प्रवेश केला. चार चोरटे या ठिकाणी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील चार हजारांची रोकड तेथून लांबवली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गोपाळ चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.

हातात ग्लोज घालून चोरी
सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजद्वारे चार चोरटे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्याचप्रमाणे प्रत्येक चोरट्याने आपल्या हातात ग्लोज घातलेले होते. याचा अर्थ आपल्या बोटांची ठसे देखील कुठे मिळायला नको व चोरी केल्यानंतर कुठला पुरावा येथे सापडायला नको याची काळजी हे चोरटे घेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून येते व ते सराईत असल्याचेही स्पष्ट होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !