डॉ.केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ


Dr. Ketki Patil जळगाव (7 ऑगस्ट 2025) : गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांचा शनिवार, 9 रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शुक्रवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियोजनाची बैठक पार पडली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके हे होते. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रा. डॉ. धनंजय बोरोले, प्रवीण कोल्हे, राहुल गिरी, चेतन चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.






बैठकीत डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. शुक्रवारी 8 रोजी सकाळी 10 वा. वैद्यकीय महाविद्यालयात सत्काराचा मुख्य कार्यक्रम होणार असून रक्तदान शिबिर, रूग्णांना फळवाटप, वृक्षारोपण मोहीम यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच सत्कार समारंभात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे ऑनलाईन संबोधन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे , असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !