जळगावच्या कोल्हे नगरात गोळीबार : एका आरोपीला अटक
Firing in Kolhe Nagar, Jalgaon: One accused arrested जळगाव (8 ऑगस्ट 2025) : शहरातील कोल्हे नगर परिसरात एका घरावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. . ही घटना गुरुवार,, 7 ऑगस्ट मध्यरात्री दोन वाजता घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीची पुंगळी जप्त करीत रात्री उशिरा दीपक तरडे या संशयीताला ताब्यात घेतले आहे.
काय घडले जळगावात
कोल्हे नगर परिसरात राजू सपकाळे हे कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहतात. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे असलेले दीपक तरडे व ललित कोळी नावाचे दोन तरुण त्यांच्या घरी आले.





घराच्या मागील खोलीत गेल्यानंतर दीपक तरडे या तरुणाने गोळीबार केला. गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे सुरुवातीला कुणालाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, दुपारच्या सुमारास हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकार्यांनी धाव घेतली.
पोलिसांना गोळीबारातील एक पुंगळी मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हे नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेमागील कारण आणि आरोपींचा शोध घेत आहेत.
