शेती विक्री न करू दिल्याच्या रागातून आईलाच संपवले नंतर पश्चातापात मुलाचीही आत्महत्या


Mother killed herself out of anger over not being allowed to sell her farm then son commits suicide out of regret लातूर (9 ऑगस्ट 2025)  कर्ज फेडण्यासाठी शेती विक्री हाच पर्याय असल्याचा उपाय मुलाने सुचवला मात्र त्यास नकार मिळताच जन्मदात्रीलाच मुलाने संपवले व पश्चातापाच्या आगीत मुलानेही आत्महत्या केली. ही संतापजनक घटना लातूर जिल्ह्यात घडली. रेणापूर तालुक्यातील सांगवी गावातील घटनेप्रकरणी मृत मुलावर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काकासाहेब वेणुनाथ जाधव असे (48) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे तर समिंदराबाई वेळूणात जाधव असे खून झालेल्या आईचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार
मृत काकासाहेबच्या वडिलांचे निधन झाले असून त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे. चार बहिणी नंतर जन्मलेल्या एकुलता एक मृत आरोपी काकासाहेब यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं. पण या लग्नात झालेला कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित थोडीशी शेती विकावी असा सल्ला त्याने आई समिंदराबाई वेळूणात जाधव यांना दिला. परंतु पतीच्या माघारी मी जमीन विकू देणार नाही असे सांगत त्याला आईने विरोध केल्यामुळे संतापाच्या भरात मुलाने आईचा खून करून मृतदेह पोत्यात बांधला. उसाच्या शेतात खड्डा करून आईचा मृतदेह पुरला. त्यानंतर शेतापासून आठ किलोमीटर दूर जाऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेत त्याने स्वतःच आयुष्य संपवलं.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !