एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचे सांगत बंटी-बबलीने जळगावात घातला 55 लाखांचा गंडा


Bunty-Babli, claiming to be Eknath Shinde’s PA, committed a fraud of Rs 55 lakh in Jalgaon जळगाव (9 ऑगस्ट 2025) : शासकीय कार्यालयात नोकरी लावून देण्याची थाप मारत व स्वतःला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करणार्‍या बंटी बबलीने 20 जणांची तब्बल 55 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गुरुवारी रात्री शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला.

काय घडले जळगावात
हितेश संघवीसह त्याची पत्नी जळगावस मुंबईत वास्तव्यास आहे. त्यांनी संगनमत केले व हितेश हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक असल्याची थाप मारली. त्यासाठी बनावट ओळखपत्र, बनावट लेटरपॅड आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवून नागरिकांचा सर्वांचा विश्वास संपादन केला.





यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
जुने गावातील विठ्ठल पेठेत राहणारे हर्षल शालिग्राम बारी (वय 32) यांच्यासह 20 जणांनी आपली फसवणूक झाल्याची आपबिती पोलिस प्रशासनाकडे मांडल्यानंतर शनीपेठ पोलिसात हितेश रमेश संघवी (49) व त्याची पत्नी अर्पिता संघवी (45, दोन्ही साई बिल्डींग, पाचोरा रोड, जळगाव, ह.मु.नवी मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश फड करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !