चाळीसगावात जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने कवी संमेलन
Poet’s conference on the occasion of World Tribal Day in Chalisgaon चाळीसगाव (10 ऑगस्ट 2025) : शहरातील ना.ब.वाचनालयात शनिवार, 9 ऑगस्ट रोजी आदिवासी साहित्य अकादमी, एम्प्लॉएज फेडरेशन व कै.हौसाई बहुउद्देशीय विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ना.ब.वाचनालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 9 ऑगस्ट 1994 दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो .





आदिवासी कवी संमेलनाचे अध्यक्ष आदिवासी साहित्य अभ्यासक तथा माजी गटशिक्षणाधिकारी डी.एम.बहिरम होते. प्रथम सत्राचे अध्यक्ष डी.एम.बहिरम यांनी आदिवासी साहित्य हे वैश्विक साहित्य दर्जाचे साहित्य बनू पाहत असल्याचे विचार मांडले.
प्रास्ताविक आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्रचे अध्यक्ष साहित्यीक सुनील गायकवाड यांनी आदिवासी साहित्य अकादमीची भूमिका आणि आदिवासी बोली भाषेबाबत विचार व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघटनचे प्रतिनिधीत्व करणारे अनामीन बेंजामिन आदिवासी भाषेबाबत भारतीय उपखंडाचे प्रतिनिधीत्व करीत असून आदिवासी भाषांबाबत अभ्यासकांनी व साहित्यिकांनी जागरूकता ठेवावी. जगातील सर्वात मृतप्राय भाषा आदिवासी प्रमाणेचं कुपोषित झाल्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
कवी संमेलनाचे उद्घाटन शिरपूर येथील अॅड.समाधान भवरे यांनी केले. आदिवासी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पहिल्या सत्रात डॉ.वाल्मिक अहिरे, अॅड.समाधान भवरे, डॉ.विजयसिंह पाटील, डॉ.प्रसन्ना अहिरे प्रमुख अथिती होते.
कवी संमेलनाचे प्रमुख अतिथी डॉ.वाल्मिक अहिरे यांनी आदिवासी साहित्य संकल्पना सांगून रापीनी धार कविता सादर केली.
कवी दिनेश चव्हाण यांनी एकटाचं ….लढला बिरसा …
एकटाचं लढला तंट्या मामा
कवी गौतमकुमार निकम यांनी आदिवासी आम्ही आदिवासी कविता आदिवासी दिवसाचे महत्व सांगितले.
प्रवीणकुमार यांनी बिरसा …ही कविता सादर केली तर मांगीलाल मोरे यांनी मास्तर …गणेश निकम यांनी जंगल तर वेदराज कपाटे यांनी अहिराणी कविता सादर केली.
यावेळी आदिवासी साहित्य संशोधक संदीप आहिरे यांनी आदिवासी साहित्य, सुनील गायकवाड यांची साहित्य चिकित्सा मांडली तर प्रा.संजय पाडवी, प्रा.लक्ष्मण वळवी, मांगीलाल पावरा यांनी आदिवासी दिनाबाबत विस्त्रुत विवेचन केले.
यावेळी आदिवासी महिलांंसह तरुण, आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी गौतमकुमार यांनी तर आभार कवी दिनेश चव्हाण यांनी मानले.
