भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात
Raksha Bandhan is celebrated with enthusiasm at Ahilyadevi Girls’ School in Bhusawal भुसावळ (11 ऑगस्ट 2025) : बहिण भावाच्या अतूट आणि विश्वासाच्या नात्याला बळकटी प्रदान करणारा रक्षाबंधन सण शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात साजरा करण्यात आला. बहिणींच्या रक्षणासाठी कटीबद्ध असणार्या पोलिस दलातील भाऊरायांना राखी बांधण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, दामिनी पथकाचे प्रमुख राजेंद्र सांगळे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले, शहर वाहतूक शाखेचे रवींद्र सांळुके, रफिक तडवी, शिवाजी पाटील, जमील शेख, हवालदार अजय पाटील, गुन्हा अन्वेषण विभागाचे नितीन सपकाळे, रवींद्र भावसार, दिलीप कोल्हे , संदीप घ्यार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यालय प्रशासनातर्फे सर्व उपस्थित पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात उपस्थित राहून उपस्थित सर्व पोलीस बांधवांना रक्षा सूत्र बांधले.
अभ्यासाचे नियोजन केल्यास यश हमखास
अतिशय भावनाप्रधान अशा या कार्यक्रमाला विद्यार्थिनींना संबोधित करताना दामिनी पथकाचे प्रमुख राजू सांगळे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत तुम्ही कठोर परिश्रम घेतल्यास आगामी काळामध्ये तुम्हाला उत्तम यश लाभेल त्यामुळे कष्ट करा, अभ्यास करा आणि जीवनात यशस्वी व्हा, असा सल्ला दिला.
112 वर कॉल केल्यास मिळेल हमखास मदत
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील म्हणाले की, पोलीस प्रशासन सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. तुम्ही केव्हाही अडचणीत असाल तर 112 क्रमांक वर कॉल करा, काही क्षणातच पोलीस आपल्याजवळ,पोहोचतील आणि आपल्याला मदत करतीलअशी माहिती दिली.
शाळेचे शिक्षक नाना पाटील सर यांनी आपल्या संस्कृतीतील रक्षाबंधन सणाचे महत्व सांगितले व पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे रक्षाबंधन सणाची महत्त्वाची जाणीव ठेवूया, असे सांगितले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी आभार मानले
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सर्व पोलीस पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील, ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता चौधरी यांनी तर आभार योगीता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.




