भुसावळ-खंडवा व जळगाव-जालना रेल्वे लाईनच्या कामाला सुरूवात
Work on Bhusawal-Khandwa and Jalgaon-Jalna railway lines begins जळगाव (12 ऑगस्ट 2025) : जळगाव-जालना या 174 किलोमीटरच्या रेल्वे लाईनला रेल्वे मंत्रालयाने 10 ऑगस्ट 2024 ला मंजुरी दिली तर सप्टेंबर 2025 महिन्यात भुसावळ-खंडवा मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे लाईनसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरूवात झाली आहे
भुसावळ-खंडवा लाईनचे जागा संपादन वेगात तर जळगाव-जालना लाईनच्या कामाला जालना-भोकरदनकडून वेग आला आहे.





मध्य रेल्वे लाइनवरील भुसावळ भागातील जळगाव-मनमाड (160 किमी) व भुसावळ-खंडवा (131 किमी) चौथ्या लाइनला डिसेंबर महिन्यात केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. भुसावळ ते खंडवा रेल्वेच्या तिसर्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे.
जळगाव-जालना या नवीन रेल्वे लाइनला मंजुरी मिळून सात महिने झाले आहेत. या रेल्वे लाइनचे काम सुरुवातीला संथ सुरू होते. आता जालना तसेच भोकरदनकडून भूसंपादन कामाला वेगात सुरुवात झाली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-खंडवा व जळगाव-जालना नवीन रेल्वे लाइनचे काम एकाच वेळी सुरू करून ते पूर्ण करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी जळगाव-जालना रेल्वे लाइनची भूसंपादन प्रक्रिया त्यानंतर रेल् ट्रॅक सर्वेक्षण केले जाणार आहे. या रेल्वे लाइनवर नवीन 22 स्टेशन, छोटे-मोठे पूल तसेच 3 बोगदे होतील.
