जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : गावठी पिस्टलासह संशयीत जाळ्यात

रावेर तालुक्यातील रणगावात झालेल्या कारवाईने खळबळ


Jalgaon Crime Branch action : Suspect caught with village pistol भुसावळ (12 ऑगस्ट 2025) : जळगाव गुन्हे शाखेने गावठी कट्टा कमरेला लावून गावात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्‍याच्या मुसक्या बांधल्या आहेत. किरण ब्रिजलाल कोळी (24, रा.रणगाव, तस.रावेर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रणगाव येथे तरुण गावठी कट्टा बाळगून गावात भीती निर्माण करीत असल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना शनिवारी मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पथकालासूचना केल्यानंतर संशयीत किरण कोळी याला कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आले व त्यास सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार प्रीतम पाटील, हवालदार नितीन बाविस्कर, पोलिस नाईक विकास सातदिवे, पोलिस कॉन्स्टेबल बबन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सचिन घुगे, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, पोलिस कॉन्स्टेबल मयूर निकम, चालक हवालदार भारत पाटील यांच्या कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !