भुसावळ तहसीलदारांचा पुढाकार : 43 वर्षांपासूनचा अतिक्रमित रस्ता केला मोकळा
Bhusawal Tehsildar’s initiative : 43-year-old encroached road cleared भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सध्या तालुक्यातील शिव रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे. टाकळी येथील गट नंबर 55 ते 43 हा अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेला शिव रस्ता नुकताच मोकळा करण्यात आला आहे.
तहसीलदारांच्या पुढाकाराने सुटला प्रश्न
तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे व टहाकळी येथील ग्राम महसूल अधिकारी मनीषा बरडिया यांनी हा रस्ता शेतकर्यांसाठी मोकळा करून दिला.
भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी राठोड तसेच वरणगाव येथील पोलिस कर्मचारी वरणगाव म्हस्के आणि इतर कर्मचार्यांच्या सहकार्याने हा रस्ता मोकळा करण्यात आला. सर्व शेतकरी मंडळी व ग्रामस्थांशी चर्चा करून सर्वांच्या संमतीने हा शिव रस्ता मोकळा करून देण्यात आला. याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.





