वरणगावात सेंट्रल बँकेजवळ मद्यपींचा बाजार : शिंदे सेेनेचे पदाधिकारी आक्रमक
जुन्या नगरपालिकेत पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्याची मागणी
Liquor market near Central Bank in Varangaon : Shinde Sena officials aggressive वरणगाव (13 ऑगस्ट 2025) : शहरातील जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, गस्त वाढवावी तसेच सेंट्रल बँक शेजारी वाईन शॉपच्या बाहेर आवारात सकाळपासून दारू पिणार्यांची संख्या वाढल्याने व बँकेत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला हे आर्थिक व्यवहार कारणासाठी येत असल्याने मद्यपींचा धुमाकूळ पाहता संबंधिताचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमित बागुल यांच्याकडे शिंदे सेनेच्या पदाधिकार्यांनी केली. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
काय आहेत मागण्या
शिवसेनेतर्फे पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गावात आणि कॉलन्यामध्ये बंद घराचे दरवाजे तोडून चोर चोर्या करीत असल्याने सामान्य नागरिक धास्तावला आहे. घरात चोरी करतानाचे चोरांचे फुटेज सीसीटीव्हीत चोरट्यांचा अद्याप शोध लागला नाही.





जुन्या नगरपालिकेत कायमस्वरूपी पोलिस नेमावेत
गावात असलेल्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये पोलिस चौकी तयार करून कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करा जेणेकरून गावात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक निर्माण होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना याबाबतचे निवेदन देणार असल्याचेही नमूद केले आहे.
वाईन शॉपच्या बाहेरच भरतो बियर बार
सेंटल बँकच्या बाजूला वाईन शॉप असल्याने दारू पिणारे हे बियर बार सारखे वाईन शॉपच्या बाहेर आवारात खुलेआम दारू पितात. दररोज बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला, जेष्ठ नागरिक, वृद्ध यांची संख्या रोजच मोठ्या प्रमाणात असते. परंतु सेंट्रल बँकेच्या शेजारी वाईन शॉपवर दारू पिणारे सकाळपासूनच गर्दी करतात. यामुळे बँकेत येणारे सामान्य नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून पोलिसांनी यावर निर्बंध घालावे, अशीही मागणी शिवसेनेकडून केली आहे.
वरील सर्व मागण्यांची दखल घेऊन तत्काळ कारवाई कारवाई करावी अन्यथा शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना शिवसेना भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, भुसावळ तालुका संघटक सुरेश चौधरी, उप जिल्हा संघटक निलेश सुरडकर, युवा सेना तालुका प्रमुख राहुल बावणे, विक्की मोरे, निलेश ठाकूर, सागर वंजारी, गणेश माळी यांची उपस्थिती होती.
