भुसावळातील लाईफ केअर हॉस्पीटलमधून भंगार चोरी : एकाला शहर पोलिसांकडून अटक
भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील जळगाव रोडवरील बंद अवस्थेतील लाईफ केअर हॉस्पिटल येथून लोखंडी खिडकीचे गज व इतर भंगार साहित्य चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी एकाला अटक केली.
काय घडले नेमके
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास संशयीत समाधान आत्माराम सपकाळे (34, रा.श्रीराम नगर, वाल्मिक नगर, दुसखेडा, ता.यावल) याने रतनसिंग उत्तम पाटील (रा. प्रभाकर हॉल जवळ, भुसावळ) यांच्या लाईफ केअर हॉस्पिटल परिसरातून सुमारे 200 किलो वजनाचे 10 लोखंडी गजांची फ्रेम सुमारे 19 हजार रुपपये तसेच सहा हजार रुपये किंमतीचे भंगार साहित्य असा एकूण 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला.
फिर्यादी रतनसिंग पाटील व साक्षीदारांनी संशयीताला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.. पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस राहुल बेहेनवाल तपास करीत आहे.