नंदुरबारात ‘कोरोना’चे पुन्हा तीन रुग्ण आढळले
नंदुरबार : शहरातील एका भागातील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर या रुग्णाच्या कुटुंबीयांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असता बाधीतांच्या कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी या तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात हलविण्यात आले आहे. रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून आता उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
