पारोळा चौफुलीवर भीषण अपघात : डंपरच्या धडकेत सुरतचा दुचाकीस्वार ठार


Terrible accident at Parola Chauphuli: Surat bike rider killed in dumper collision पारोळा (13 ऑगस्ट 2025) :L शहरातील बायपास धरणगाव चौफुलीवर डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाला. कालू उर्फ घनश्याम ममराज राठोड (35, गोराजी बिल्डिंग, श्री निवास ग्रीन सिटी, ता.पैसाना, जि.कोडदरा वारेली, सुरत) असे मृताचे तर विष्णू संतोष जाधव (16, रा.टेमला) असे जखमीचे नाव आहे.

काय घडले पारोळा शहरात
सोमवार, 11 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घनश्याम राठोड हा आपल्या दुचाकी (क्र.एमएच 19 सी.एच. 9045) ने धुळ्याकडून जळगावकडे जात असताना यावेळी पारोळा बायपास धरणगाव चौफुलीवर डंपर (क्रमांक एम.एच.54-0358) वरील चालकाने वळण घेऊन अचानक ब्रेक लावल्याने मागून येणार्‍या घनश्याम राठोड यास डोक्याला व तोंडास जबर मार लागुन तो जागेवरच गतप्राण झाला तर विष्णूच्या डोक्यास मार लागुन तो जखमी झाला.






त्याच्यावर पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करून धुळे येथे हलवण्यात आले. डंपर चालक विक्रमसिंग अवधराजसिंग (रा.खामचोरा माजौली, जि.सिंधी, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेऊन त्याविरुद्ध पारोळा पोलिसात रवींद्र ममराज राठोड (पारोळा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शरद पाटील करीत आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !