प्रवासी सुखावले : रावेरसह बोदवड स्थानकांवर या ‘दोन रेल्वे गाड्यांना’ थांबा
Passengers happy : These ‘two train trains’ stop at Raver and Bodwad stations भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : रावेरसह बोदवड स्थानकांवर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री खडसेंच्या पाठपुराव्याला यश
नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील काही वर्दळीच्या स्थानकांवर प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याबाबत सुद्धा मंत्री खडसे यांनी चर्चा केली होती. त्यापैकी पुणे-दानापूर आणि अमरावती-सुरत या गाड्यांना पहिल्या टप्प्यात थांबा मंजूर झाला आहे. त्या संदर्भात माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.





या गाड्यांना केली थांब्याची मागणी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 12150 दानापूर-पुणे एक्स्प्रेसला रावेर येथे, 12656/12655 नवजीवन एक्स्प्रेसला बोदवड येथे, 22177/22178 महानगरी एक्स्प्रेसला रावेर येथे, 11057/11058 अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसला निंभोरा येथे, 12113/12114 गरीब रथ एक्स्प्रेसला मलकापुर येथे, 12719/12720 जयपुर-हैदराबाद आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसला नांदुरा येथे, 12129/12130 आझाद हिंद आणि 20925/20926 सुरत-अमरावती एक्सप्रेसला बोदवड येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली होती.
या गाड्यांचे थांबे मंजूर झाल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग आणि सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मंत्री खडसे यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पुणे-दानापूर एक्स्प्रेसला रावेर येथे तसेच अमरावती-सुरत एक्स्प्रेसला बोदवड येथे थांबा मंजूर केल्याने या भागातील प्रवासी सुखावले आहेत.
