भुसावळातील द वर्ल्ड स्कूलतर्फे हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत प्रभातफेरी
भुसावळ (19 ऑग्स्ट 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलतर्फे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत प्रभातफेरी काढण्यात आली.
इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. प्रभातफेरी म्युनिसिपल हायस्कूलपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापर्यंत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर घोषणांनी वातावरण भारावून टाकले. या उपक्रमाचा उद्देश देशभक्ती जागृत करणे, एकोपा वाढवणे व राष्ट्रीय ध्वजाबाबत जनजागृती करणे होता. मैदानावर विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा व वंदे मातरम म्हटले. अल्पोहाराचे आयोजनही करण्यात आले. प्रभातफेरीचे आयोजन मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. शिक्षक, पर्यवेक्षक व कर्मचार्यांचे विशेष सहकार्य लाभले.





