पाचोरा शहरातील वीज कंपनीचा लाचखोर सहाय्यक अभियंता पोलिस कोठडीत


Bribery assistant engineer of electricity company in Pachora city in police custody भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : सोलर प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी 29 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना पाचोरा महावितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (38, रा.अभियंता नगर, संभाजी चौकाजवळ, पाचोरा) यास जळगाव एसीबीने मंगळवार, 12 रोजी लाच स्वीकारताच अटक केली होती. आरोपीला बुधवारी जळगाव सत्र न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
सोलर फिटिंगचा व्यवसाय असलेल्या तक्रारदाराने एकूण तीन प्रकरणे तयार करून ऑनलाईन सबमीट केली. या तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी तीन हजारांप्रमाणे नऊ हजार व यापूर्वी एकूण 28 प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिल्याने 30 हजार रुपये दिल्यानंतर उर्वरीत 40 हजार रुपये होत असून पहिल्या हप्त्यात 20 हजार व आधीचे नऊ हजार रुपये मिळून 29 हजारांची लाच मागणी 11 व 12 मनोज मोरे यांनी केली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला व लाच स्वीकारताच मनोज मोरे यास अटक करण्यात आली.






आरोपीला एक दिवसाची कोठडी
आरोपीला मोरेला जळगाव सत्र न्यायालयात मंगळवारी हजर केल्यानंतर एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपउपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे व सहकारी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !