मंत्री संजय सावकारे प्रश्न सोडवू शकतात त्यांनीच आंदोकांसोबत करावी चर्चा : भुसावळात आंदोलकांचा पवित्रा

पुर्नवसनासाठी आंदोलकांनी भुसावळ पालिकेबाहेर भर पावसातही मांडला ठिय्या


Minister Sanjay Savkare can solve the problems, he should discuss with the protesters : Protesters’ stance in Bhusawal भुसावळ (14 ऑगस्ट 2025) : रेल्वे अतिक्रमण धारकांनी पालिका प्रशासकिय कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू होते. दरम्यान, मुख्याधिकारी राजेंद्र फातलेंनी या प्रश्नी पालिकेकडून चेंडू टोलवल्यामुळे आंदोलकांनी आमच्या सोबत मंत्री संजय सावकारे यांनी चर्चा करावी, तेच हा प्रश्न सोडवू शकतात असा पवित्रा घेतला आहे.

पाच हजार घरे जमीनदोस्त
रेल्वे विभागाने गेल्या सात वर्षांपूर्वी विकासकामांच्या नावाखाली 5 हजार घरे जमीनदोस्त केली. सात वर्ष उलटूनही हा प्रश्न सुटत नसल्याने अतिक्रमणधारकांनी मंगळवारपासून पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी आंदोलनाला भेट देवून चर्चा केली मात्र हा प्रश्न आता सबंधीत सध्या तापी काठावर सर्वे नंबर 63/1 या जागेचे आरक्षण उठविण्यासाठी मंत्रालयात असल्याचे सांगितले. यामुळे आता हा प्रश्न वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हेच सोडवू शकतात. त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे, यामुळे त्यांनी चर्चेसाठी येवून हा प्रश्न सोडवावा, असे मत आंदोलकांतर्फे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी मांडले आहे. मंत्री सावकारे हा प्रश्न सोडवतील काय? याकडेही लक्ष लागून आहे.




सुविधा दिल्या नाहीत
अतिक्रमणात बेघर झालेल्यांनी सध्या तापी काठावर सर्वे नंबर 63/1 मध्ये अधिवास केला आहे. या ठिकाणी पालिका प्रशासन कोणत्याही सुविधा देत नाही. या जागेवर पालिकेचे यापूर्वी पार्क साठीचे आरक्षण आहे. हे आरक्षण मंत्री मंडळ स्तरावरुनच उठवले जाईल. यामुळे हे आरक्षण काढावे अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !