यावलला अज्ञात माथेफिरूने केळीवर फिरवले तणनाशक : लाखाचे नुकसान


Unknown miscreant sprayed herbicide on banana : Loss of lakhs यावल (14 ऑगस्ट 2025) : शहरातील बोरावल गेट भागातील रहिवाशी एका शेतकर्‍याच्या शहरालगत असलेल्या शेतात केळी पिकास ड्रीपव्दारे औषध पाण्यासाठी भरून ठेवलेल्या बॅरलमध्ये अज्ञात माथेफिरूने तन नाशक टाकले त्यामुळे शेतकर्‍याचे तब्बल बाराशे केळी खोड जळाले आहे. यामध्ये शेतकर्‍याचे 95 हजारांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

काय घडले शेतकर्‍यासोबत ?
यावल शहरातील बोरावल गेट भागात लिलाधर उर्फ बापू प्रल्हाद महाजन (52) हे शेतकरी राहतात. त्यांचे यावल शेत शिवारात बोरावल रस्त्यावर शेत गट क्रमांक 1164 आहे. यामध्ये त्यांनी केडीची लागवड केलेली आहे. ही केळी चार महिन्याची आहेत. केळीचे खोड चांगल्यापैकी वाढ झालेले आहेत तर त्यांनी याच शेतात केळीला ड्रीप व्दारे औषध देण्याकरीता येथे एक 200 लिटरचे बॅरल पाण्याने भरून ठेवले होते व त्या बॅरलच्या माध्यमातून ते केळीला विविध प्रकारचे औषधी ड्रीपव्दारे देत होते. दरम्यान त्या बॅरलमध्ये कुणीतरी अज्ञात माथेफिरूने तणनाशक औषध टाकून दिले व ते पाणी ड्रीपव्दारे केळीला सोडून दिले. यामुळे गुरूवारी सकाळी केळीचे तब्बल एक हजार 200 खोड हे खराब होऊन जमीनदोस्त झाले व जळाले. यात शेतकर्‍याचे 95 हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात शेतकर्‍याने अज्ञात माथेफिरूविरुद्ध तक्रार दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !