मारूळ ग्रामपंचायत साहित्य खरेदी व विकासकामात गैरव्यवहार ?


Marul Gram Panchayat: Misappropriation in material procurement and development work? यावल (14 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील मारुळ या गावाच्या ग्रामपंचायती विविध विकास निधी, शेती कर वसुलीी अफरातफर झाल्याची तक्रार नागरिकांनी पंचायत समितीकडे केली होती. दरम्यान याप्रकरणी पंचायत समितीकडून सरपंच तत्कालीन ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली मात्र तरीदेखील येथे योग्य चौकशी झाली नाही. तातडीने येथे चौकशी केली जावी, अशी मागणी तक्रारदारांनी पुन्हा केली आहे.

शेती कर वसुलील अपहार ?
मारूळ, ता.यावल येथील ग्रामपंचायतीत विकास निधी, शेती कर वसुली या रकमेत अफलातफर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा निधी अंतर्गत साहित्य खरेदी करताना कोणत्याही प्रकारची दरपत्रके अंदाजपत्रके व मूल्यांकन ग्रामपंचायत दप्तरी तपासणी साठी उपलब्ध झालेली नाही. ग्रामपंचायत ने केलेल्या साहित्य खरेदी व विकास कामावर केलेल्या खर्चाची नियमानुसार पडताळणी करता आलेली नाही, अशी तक्रार व या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मुरब्बत अली अकबर अली, सय्यद खालीद मझर अली, सय्यद मुनाफ मसूद अली, सय्यद नदीम युनूस अली, शेर अली तुराब अली सह आदींनी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पंचायत समितीकडून ग्रामपंचायतचे सरपंच, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती मात्र तरीदेखील या प्रकाराची चौकशी झालीचं नाही म्हणुन पुन्हा ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे निवेदन देऊन तक्रारदारांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !