14 वर्षीय अल्पवयीनावर अत्याचार : दोघांना बेड्या


Torture of 14-year-old minor : Two arrested अमळनेर (14 ऑगस्ट 2025) : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून नेत अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी बुधवार, 13 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता अमळनेर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

काय घडले अल्पवयीनासोबत
अमळनेरच्या एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी) (रा. अमळनेर) याने पीडित मुलीला फोन करून भेटण्यास बोलविले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवर एका भागात अत्याचार केला. या घटनेसाठी संशयित आरोपीला गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी) याने सहकार्य केले.






दरम्यान हा प्रकार घरी आल्यानंतर पीडीतेने नातेवाईकांना सांगतातच नातेवाईकांसह तिने अमळनेर पोलिसात धाव घेऊन दोघांविरोधात फिर्याद दिली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बुधवार, 13 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी) आणि गण्या उर्फ नाना साळुंखे (पारधी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करताच त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !