जळगावात कॅफेआड अश्लील चाळे : पोलिसांच्या छापेमारीत सात युगूलांवर कारवाई
Obscene chat rooms outside a cafe in Jalgaon : Action taken against seven couples in police raid जळगाव (15 ऑगस्ट 2025) : जामनेर तालुक्यातील बेटावदच्या तरुणाची हत्या झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने अनधिकृतरित्या सुरू असलेल्या कॅफेंवर लक्ष केंद्रीत केले आहे. या कॅफेंमध्ये विशिष्ट कप्पा बनवून युगूलांना अश्लील चाळे करण्याची मुभा दिली जात असल्याने जळगावात पोलिस प्रशासनाने रामानंद हद्दीतील ‘कॅफे कॉलेज कट्टा’ नावाच्या कॅफेवर गुरुवारी दुपारी दोन वाजता कारवाई करीत सात युगूलांना पकडले तर कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंदनगर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त माहिती मिळाली होती की, ‘कॅफे कॉलेज कट्टा’ येथे गाड्यांमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून, पडदे लावून आणि अंधार करून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील कृत्ये करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.





त्यानंतर पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकला व सात जोडपी अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडण्यात आली. पोलिसांनी त्यांना बाहेर बोलावून त्यांची माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या कॅफे शॉपमध्ये दर्शनी भागात कुठलाही परवाना लावलेला नव्हता. या प्रकरणी कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (30, रा. रोटवद, ता. जामनेर, सध्या लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव) याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी आणि महिला पोलीस शिपाई स्वाती पाटील आदींच्या पथकाने केली.
