अजित पवार स्पष्टच बोलून गेले : भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच तू आमदार झालास !


Ajit Pawar spoke clearly: You became an MLA because you paid attention to Bhavki! सांगली (16 ऑगस्ट 2025) : स्पष्टवक्ता म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी आज शनिवारी आमदार रोहित पवारांच्या गावकीच्या नादात भावकी विसरल्याच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. चेहर्‍यावर ल हास्य कायम ठेवत ते म्हणाले की, भावकीने लक्ष दिले म्हणूनच तू निवडून आलासा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांना सुनावत नादाला न लागण्याचाही सल्ला दिला.

भावकीच्या वक्तव्याची करून दिली आठवण
रोहित पवार यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका कार्यक्रमात अजित पवारांना भावकीची आठवण करून दिली होती. अजित पवारांना गावकीच्या नादात भावकीचा विसर पडला आहे. त्यांनी निधीच्या बाबतीत कुठेतरी याचा विचार करावा, असे ते म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांनी लागलीच त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला.






रोहित मघाशी बोलताना म्हणाला की, दादांचे गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे नाही. पण भावकीकडे लक्ष दिले म्हणूनच तू आमदार झालास. आपण पोस्टल बॅलेटवर निवडून आला आहात हे लक्षात असू द्या. जयंतराव (जयंत पाटील) त्याला विचारा, किती मते पडली आहेत? असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हसत रोहित यांना आपल्या नादी न लागण्याचाही सल्ला दिला.

विचारधारेशी तडजोड नाहीच
मी महायुतीत गेल्यापासून कुणावरही टीका केली नाही. तु्म्ही तुमच्या विचाराने चालत आहात, मी माझ्या विचाराने चालत आहे. पण त्यात आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी कुठेही तडजोड केली नाही. मला रोहितने सांगितले की, जयंत पाटील व मी हेलिकॉप्टरने जाईन. त्यावेळी मला वाटले की, ते माझे भाषण ऐकायला दोघेही नसणार. पण माझे नशीब बघा हे दोघेही भाषण ऐकायला आहेत, असे ते म्हणाले.

खूप चुरूचुरू बोलायला लागलाय
मी रोहितचे भाषण ऐकत होतो. खूप चुरूचुरू बोलायला लागला आहे, असे सांगून अजित पवारांनी स्वतःचे उदाहरण दिले. ते म्हणाले, 1990 साली मी, जयंत पाटील आर. आर. पाटील पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलो. 1990, 1995 आणि 1999 असे तीन टर्म लागोपाठ निवडून आल्यानंतरही 1999 च्या आघाडी सरकारच्या काळात आम्हाला फार स्पेस मिळाली नाही. 2004 साली थोडी संधी मिळाली. पण हल्ली काही काही जणांना पहिल्या टर्मलाच भाषणबाजी करायची असते. मी म्हणजे कुणीतरी मोठा अशा अर्विभावात ते दुसर्‍या पक्षालाही सल्ले देत फिरतात.

जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व
अजित पवारांनी यावेळी जयंत पाटील हे आवाजात प्रेमळपणा असणारे देखणे व्यक्तीमत्व असल्याच्या एका उल्लेखाचा दाखला दिला. जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व. मग आम्ही देखणे नाही काय? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचे आणि आमचीच बिन पाण्याने करायची, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान ऐकताच कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !